। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी । दरोडा टाकून फरार झालेल्या चार अट्टल दरोडेखोरांची टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे. अवघ्या 24 तासांमध्ये पोलिसांनी या चारही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गुन्ह्यातील चारही दरोडेखोर हे बीड जिल्ह्यातील आहेत. प्रवासी म्हणून बसलेल्या चारही जणांनी चालकाला लुटून सियाझ कार व के्रडीट कार्ड घेऊन पोबारा केला होता. दरम्यान, चाकण परिसरातून कोतवाली पोलिसांनी सियाझ कार ताब्यात घेतली असून, तेथूनच या चारही दरोडेखोरांचा सुगावा लागला.
बाबासाहेब उर्फ बाबू बाळू शिंदे (वय 20 वर्षे, रा. दहीवंडी, ता. शिरुर कासार, जि. बीड), विश्वजित सिध्देश्वर पवार (वय 20 वर्षे, रा. गोमलववाडा, ता. शिरुर कासार, जि. बीड), रमेश कचरू आघाव (वय 20 वर्षे, रा. दहीवंडे, ता. शिरुर कासार, जि. बीड), योगेश संजय आघाव (वय 19 वर्षे, रा. दहीवंडी ता. शिरुर कासार, जि. बीड) यास शिरूर कासार, बीड येथून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यावर त्यांचा आणखी एक साथीदार फरार झाला आहे. याबाबत दत्तात्रय खंडू हापसे (वय 32 वर्षे, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली होती. माळीवाडा, अहमदनगर येथून राहुरी येथे जाण्याकरिता पॅसेंजर म्हणून बसलेल्या पाच अनोळखी पुरुषांनी रात्रीच्या सुमारास नांदगाव फाटा येथे उलटी आल्याचे कारणावरुन गाडी थांबण्यास सांगून माझ्या डोळ्यात तिखट टाकून माझ्या गळ्याला टोकदार वस्तू लावून पाठीमागील सिटमध्ये दाबून धरुन सुपा येथे घेऊन एटीएम व क्रेडीट कार्ड हिसकावून घेतले.
त्याचा पासवर्ड बळजबरीने विचारुन माझी मारुती सियाझ कंपनीची फोर व्हीलर गाडी घेऊन पोबारा केला. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली को, सदर गुन्ह्यातील आरोपी हे पुणे चाकण परिसरात सदर गाडीची विल्हेवाट लावण्याकरिता थांबलेले आहेत. त्यावरून गुन्हे शोध पथकासह चाकण पुणे येथे जाऊन सापळा लावून संशयीत इसमास ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याने दरोडेखोरांची नावे सांगितली. पुढील तपास सपोनि विवेक पवार हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोना गणेश धोत्रे , पोना योगेश भिंगारदिवे, पोना रविंद्र टकले, पोना विष्णू भागवत, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोकॉ सुमित गवळी, पोकॉ सुशिल वाघेला, पोकॉ योगेश कवाष्टे, पोकॉ भारत इंगळे, पोकॉ कैलास शिरसाठ, पोकॉ तान्हाजी पवार, पोकॉ प्रमोद लहारे, पोकॉ सोमनाथ राउत, पोकॉ सुजय हिवाळे, मोबाईल सेलचे पोकॉ. नितीन शिंदे , पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली.