। अहमदनगर । दि.15 फेब्रुवारी । नगर शहरातील महत्त्चाच्या असलेल्या दिल्लीगेटमार्गे सुरू असलेली जड वाहतुक पोलीसांनी बंद करा अन्यथा वाहनांची हवा सोडली जाईल असा इशारा चर्मकार विकास संघाचे युवा शहर जिल्हाध्यक्ष नीलेश आंबेडकर यांंनी दिला आहे.
कल्याण, नाशिकहून येणारी जड वाहने वाहतुक पोलीसांच्या आशीर्वादाने दिल्लीगेटमार्गे तेही वाहतुक शाखा कार्यालयाच्यासमोरुन जाते. दिल्लीगेट परिसरात जड वाहनामुळे वाहतुकीची कोंडी होते. नीलक्रांती चौकात वाहनधारकांना मोठा त्रास होतो.
दिल्लीगेटजवळ वाहतुक शाखेचा पोलीस कर्मचारी ड्युटीवर नसतात. न्यू आर्टस् कॉलेज, सारडा कॉलेज, रेशिडेन्सिअल हायस्कूल, तसेच चौपटी कारंजा, चितळे रोड, दिल्लीगेटमार्गे जुनी महानगरपालिका, भाऊसाहेब फिरोदियाकडे नगरकरांना जाणार्यासाठी मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो.
दिल्लीगेटमार्गे जड वाहने पोलीसांच्या नाकावर ये- जा करतात त्यामुळे पायी जाणार्या वयोवृद्ध, लहानमुलासंह महिलांनी त्रास होतो. या जड वाहनामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. कल्याणरोड, पुणे रोड, विळदघाट परिसरात असलेल्या बाह्यवळण येथे वाहतुक पोलीसांची ड्युटी लावली असते.
त्यानंतर जड वाहने मलिदा देत शहरामध्ये धुसतात. कल्याणकडे जाणार्या सर्वच जड वाहने दिल्लीगेट मार्गे जात असल्याने वाहतुक जाम होते. जड वाहतुक तातडीने बंद करा अन्यथा वाहनांची हवा सोडणार असल्याचा इशारा चर्मकार विकास संघाचे युवा शहर जिल्हाध्यक्ष नीलेश आंबेडकर यांंनी दिला आहे.
