निंबळक गटात निधीची कमतरता न भासता गावातील सर्व प्रलंबीत कामे मार्गी लावली जाणार : माधवराव लामखडे
। अहमदनगर । दि.15 फेब्रुवारी । सबका योजना सबका विकास जीपीडीपी अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्या संबंधीचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात निमगाव वाघाचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार माजी पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आदींसह अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
चास (ता. नगर) येथील साई लॉन येथे झालेल्या कार्यक्रमात निमगाव वाघाच्या सरपंचपदी रुपाली विजय जाधव, उपसरपंचपदी अलका भाऊसाहेब गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, प्रमोद जाधव, किरण जाधव, मुन्नाबी शेख, ज्ञानदेव कापसे, गोकुळ जाधव, डॉ.विजय जाधव, विजय शिंदे, किरण सांगळे गुरुजी यांच्यासह चास गणातील गावांचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी सत्कार झाला.
रामदास भोर यांनी गावाच्या विकासासाठी योगदान देण्याचे नवनिर्वाचित पदाधिकार्यांना आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी निंबळक गटासाठी मोठ्या प्रमाणात निधी आनून विकासात्मक कार्ये मार्गी लावण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने निधीची कमतरता न भासता सर्व प्रलंबीत कामे मार्गी लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
