। अहमदनगर । दि.19 फेब्रुवारी । शेतकर्याचे शेतात उभे असलेले अडीच लाख रुपये किंमतीचे चार एकर उसाचे खोडवा पीक दोघांनी जाळून टाकले. जळालेल्या खोडका पिकाची चोरी करुन पीक श्रीगोंदा फॅक्टरीत दिल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे शनिवारी (दि.13) रोजी सोडनऊ ते मंगळवार (दि.16) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारस घडली.
याबाबतची माहिती अशी की, मिनल मोहन भितांडे (रा.पेडगाव, ता.श्रीगोंदा) या त्यांचे पती मोहन भितांडे यांच्यासह शेतातील खोडवा उस फिल्डमन यांना दाखविण्यसाठी जात असताना रुपचंद दत्तात्रय भिताडे व शुभम दत्तात्रय भितांडे (रा.पेडगाव) यांनी त्यांना अडविले आणी मारहाण करुन जखमी केले.
या प्रकरणी मोहन भितांडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याचा मनात राग येऊन रुपचंद व शुभम यांनी मोहन भितांडे हॉस्पिटलमध्ये औषधोपचारा घेत असताना त्याचे उसाचे चार एकर पिक पेटवून दिले. रुपचंद याने जळालेला खोडवा उसाची चोरी करुन श्रीगोंदा कारखाना येथे स्वतःच्या नावावर दिला.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी मिनल भितांडे यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 379, 435 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली.अधिक तपास पोलीस उप निरिक्षक गट हे करीत आहेत.
