। अहमदनगर । दि.20 फेब्रुवारी । बालिकाश्रम रोडवरील इस्सार पेट्रोल पंपाजवळ असलेले चंदनाचे झाड अज्ञात चोरांनी तोडुन चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.18) रोजी पहाटे 3 च्या सुमारास घडली.
याबाबतीची अधिक माहिती अशी की, बालिकाश्रम रोडवरील बोरुडे मळा परिसरातील इस्सार पेट्रोल पंपाजवळ असलेली चंदनाचे झाड दोन अज्ञात चोरांनी तोडुन चोरुन नेले.
याप्रकरणी सिक्युरिटी गार्ड शंकर किसन डहाळे (वय 55, रा.बोरुडे मळा, बालिककाश्रम रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी भादवि कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस नाईक गव्हाणे हे करीत आहे.
