। अहमदनगर । दि.20 फेब्रुवारी । नगर-कल्याण रोडने भरधाव वेगात जाणार्या मालट्रकने दुचाकीस धडक दिली, या धडकेत दुचाकीस्वार नवनाथ रामभाऊ काळे (वय 40, रा.निमगांव घाणा) हा जागीच मयत झाला. ही घटना जखनगाव शिवरात जिओ मोबाईल टॉवरच्या समोर गुरुवारी (दि.18) रोजी 4 च्या सुमारास घडली.
माहिती अशी की, शिवबहादुर लाल बहादुर (रा.बामपुरा, ता.मेझा, जिल्हा इलाहाबाद, उत्तरप्रदेश) हा त्याची मालट्रक (क्र.एम.एच.20 डीई 3807) भरधाव वेगात जखनगाव शिवरातून जात असताना जीओ मोबाईल टॉवरच्या समोरच्या रोडवर कल्यण रोडवरुन येत असताना समोरील टिव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल (क्र .एम.एच 16 सीबी 8470)हीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार नवनाथ रामभाऊ काळे याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी बाळु रामभाऊ काळे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक शिवबहादुर लाल बहादुर याच्या विरुध्द भादवि कलम 304, (अ) 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार धुमाळ हे करीत आहे.
