धरतीचौक परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवा

मानव संरक्षण समितीचे उपायुक्तांना निवेदन

 

। अहमदनगर । दि.16 फेब्रुवारी ।    नगर शहरातील काळू बागवान गल्ली, ख्रिस्तगल्ली परिसरात सुमारे 3 वर्षांपासून 10 ते 12 घरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. याबाबत अनेकवेळा अधिकारी, पदाधिकारी यांना निवेदने दिली. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही झालेले नाही.


येथील रहिवाशांना लांबून पाणी आणावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी आपण या भागात समक्ष येऊन पाहणी करुन ही समस्या दूर करावी, अशा मागणीचे निवेदन मानव संरक्षण समितीचे शहराध्यक्ष इम्रान बागवान यांनी मनपा आयुक्तांना दिले.


याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी उपायुक्तांना येथील समस्यांबाबत माहिती दिली. उपायुक्तांनी याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करु, असे आश्‍वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post