खोसपुरीत सोन्याचे गंठण व रोख रक्कमेवर डल्ला

। अहमदनगर ।  दि.18  फेब्रुवारी ।  बंद घराचे कुलूप तोडून चोराने आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करुन रोख रक्कमेसह सोन्याचे गंठण चोरुन नेले. हि घटना नगर तालुक्यातील खोसपुरी येथे सोमवारी (दि.15) दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली.


दिपा अंजन दत्ता (वय 28, रा.खोसपुरी, ता.नगर) यांच्या राहत्या बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. आतील समानाची उचका पाचक केली. घरामधील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व 20 हजार रुपयाची रोकड असा ऐवज चोरुन नेला.


याप्रकरणी नगर तालुका पोलीसांनी दिपा दत्ता यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 454, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस नाईक गांगर्डे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post