मध्यप्रदेशातून सात आरोपींना अटक
नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
। अहमदनगर । दि.18 फेब्रुवारी । मध्यप्रदेश येथुन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये जाऊन लग्न समारीांत रोख रक्कम व दागिने चोरी करणार्या 7 आरोपींना मध्यप्रदेशख येथे जेरंबद करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, वाहने असा सुमारे 23.33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गोलू ऊर्फ सुमेर सिसोदिया (25), संदीप सुमेरा जोरदार झोजा ऊर्फ सिसोदिया (19, दोघे मूळ राहणार बडा पिपलीयॉ, जि. देवास, मध्यप्रदेश, हल्ली बाजारपूर जैधपुर, ज्ञानमंदिर गल्ली, नवी दिल्ली), राधेश्याम उदयराम राजपूत ऊर्फ ठाकूर (30, अलीविहार, सरिताविहार, दिल्ली), बिपीन राजपाल सिंग (21, लखपत कॉलनी, मिठापूर एक्टेन्शन, नवी दिल्ली), गिरीराज दिनेशचंद्र शुक्ला (25, जैधपूर, बदापूर, नवी दिल्ली), अनिल कमल सिसोदिया (30, जैधपूर, ज्ञानमंदिर गल्ली, नवी दिल्ली, मूळ बडा पिपलियॉ, जि. देवास, मध्यप्रदेश), विशालकुमार बनी सिंग (10, राशननगर, अगवानपूर, हरियाणा) अशी आरोपींची नावे आहेत.
शिर्डी येथील लग्न समारंभात 15 हजारांची रक्कम असलेल्या बॅगेची चोरी झाली. चोर मध्यप्रदेशातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. आरोपींना शोधण्यासाठी पथके मध्यप्रदेशात पाठवण्यात आली. त्यांनी सात जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून 55 हजार रोख, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली 13 लाख किमतीची हुंडाई व्हेन्यू कार व 9 लाख किमतीची मारुती सुझुकी बलेनो कार, तसेच 78 हजार किमतीचे 6 मोबाइल असा एकूण 23 लाख 33 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सहायक निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सोन्याबापू नानेकर, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप दरंदले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
