। मुंबई । दि.04 फेब्रुवारी । भारताचा केंद्रीय अर्थसंकल्पाचं शेअर मार्केटने स्वागत केल्यानंतर सोन्याच्या भावांवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामध्येच आता कस्टम ड्युटी कमी झाल्याने सोन्याचे दर घसरले होते. कालच्या वाढीनंतर आता आज पुन्हा सोन्याचे भाव उतरले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या वायदा भाव 350 रूपयांनी घसरून 47,400 वर ट्रेड करत आहे तर चांदी 67,729 रूपयांवर पोहचली आहे. त्यामुळे सध्या लग्न सराईचा मोसम पाहता आता कमी होणारे सोन्याचे भाव पाहून अनेकांनी या संधीचं सोनं करत खरेदीलाही पसंती दिली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी कमी केल्याने अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराताही सोन्याचे भाव खाली आले आहे. अमेरिकेत सोनं 10.89 डॉलरच्या घसरणी सह 1823.34 डॉलर प्रति औंस अशा दरात आहे. तर चांदी 0.30 डॉलरच्या घसरणीसह 26.5 डॉलरवर बाजार करत आहे.
