। अहमदनगर । दि.17 फेब्रुवारी । घरासमोर बांधलेल्या 14 हजार रुपये किंमतीची शेळी अज्ञात दोन चोरानी चोरुन नेली. हि घटना नागापूर येथील आदर्श नगर, आझाद चौक येथे मंगळवारी (दि.16) दुपारी घडली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी परवीन बानू कदीर पठाण (रा.आदर्शनकर, नागापूर) यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 379, 34 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक साबीर शेख हे करीत आहेत.
