मुलाच्या गळ्यातील दागीन्याची चोरी

। अहमदनगर । दि.17 फेब्रुवारी ।   लहान मुलाच्या गळ्यातील 5 हजार 100 रुपये किंमतीचा सोन्याचा पत्ता चोरुन नेल्याची घटना नगर मधील सिध्दार्थनगर येथे सोमवारी (दि.15) सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.


गणेश राजु कांबळे (वय 25, रा.सिध्दार्थनगर) यांचा लहान मुलाच्या गळ्यात 5 हजार 100 रुपये किंमतीच्या सोन्याचा पत्ता होता. सदर मुलगा घरा बाहेर खेळत असताना प्रकाश योहान वैरागळ (वय 38, रा.सिध्दार्थनगर) याने चोरुन नेला.


या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गणेश कांबळे यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक करत करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post