। अहमदनगर । दि.17 फेब्रुवारी । घराच्या पाठीमागील खिडकीचे गज तोडून चोरानी आत प्रवेश केला. घरात उचकापाचक करुन कपाटातील दोन लाख पंच्याऐशी हजार रुपये किंमतीचे सोन्या - चांदीचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला.
हि घटना मंगळवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास बुरुडगावरोड वरील डॉक्टर कॉलनी येथील साईगंगा अपार्टमेंट येथे घडली.
या बाबतची माहिती अशी की, किर्तीकुमार विजयचंद संचित (बुरुडगाव) यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीचे गज कापून अज्ञाचा चोरानी आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाची व सामानाची उचकापाचक केली.
कपाटातील 2 लाख 85 हजार रुपये किंमतीचे सोन्या - चांदीचे दागीने व रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी किर्तीकुमार संचित यांच्या फिर्यादीवरुन घरफोडीच्या गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास सपोनि पवार करीत आहेत.
