ती टोळी अखेर केली हद्दपार...वाचा सविस्तर

राहुरीतील मनोज डोंगरेची टोळी हद्दपार

 


। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी ।  राहुरी तालुक्यातील कुप्रसिध्द टोळीप्रमुख मनोज गोरक्षनाथ डोंगरे (वय 26) व त्याच्या टोळीतील स्वप्निल रमेश बोरुडे (वय 27), आबासाहेब बाळासाहेब वरखेडे (वय 34),


आदेश उर्फ आदिनाथ रवींद्र जाधव (वय 23, सर्व रा. राहुरी फॅक्टरी, राहुरी) यांना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दीड वर्षासाठी (एक वर्ष सहा महिने) अहमदनगर जिल्हा हद्दीतून हद्दपार केले आहे.


16 फेब्रुवारी रोजी हद्दपारीची अंतिम कारवाई करण्यात आली आहे. या टोळीविरुध्द राहुरीसह जिल्ह्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव राहुरी पोलिस ठाण्याने दिला होता.

Post a Comment

Previous Post Next Post