स्वस्त झालेल्या सोन्याच्या किंमतीत वाढ!

। नवी दिल्ली । दि.19 फेब्रुवारी ।  सराफा बाजारात सोने 717 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजच्या सुरुवातीच्या व्यापारात बुधवारी सोन्याच्या किमती वाढल्यात.


सकाळी 11.30 वाजता एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 176 रुपयांनी वाढलेला दिसून येत आहे. तर चांदीच्या वायदा भावात 88 रुपयांची उसळी नोंदवली गेलीय.


सोन्याचा भाव 176 रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्रॅम 46,379 रुपयांच्या भावावर व्यापार करत होते, एक किलो चांदीची किंमत 69183 रुपये आहे.


बुधवारी सोन्यासह चांदीच्या भावातही 1,274 रुपयांची मोठी घसरण नोंदली गेली. या घसरणीनंतर 1 किलो चांदीची किंमत 68,239 रुपये झाली होती.


यापूर्वी मंगळवारच्या व्यापार सत्रात चांदीची किंमत 69,513 रुपये झाली होती. सोन्या-चांदीच्या किमतीत आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात.


सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील.


त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत, असंही काही जाणकारांचं मत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post