। कराड । दि.13 फेब्रुवारी । सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांचा 80 वा वाढदिवस गुरुवारीमोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसा निमित्ताने राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते व हितचिंतकांनी खा. पाटील यांना फोनवरून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
खा. श्रीनिवास पाटील यांचे त्यांची पत्नी सौ. रजनीदेवी पाटील यांनी सकाळी वाढदिवसानिमित्त औक्षण केले. त्यानंतर प्रीति-संगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळाचे दर्शन खा. पाटील यांनी घेतले. सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी गोटे (कराड) येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून मान्यवरांसह कार्यकर्ते व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्य-मंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खा. सुप्रिया सुळे, ना. जयंत पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. बाळासाहेब पाटील, खा. गिरीश बापट,
खा. डॉ. अमोल कोल्हे, ना. धनंजय मुंढे, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, ना. शंभूराज देसाई, ना. सतेज पाटील, ना. हसन मुश्रीफ, आ. मकरंद पाटील, खा. सुनील तटकरे, आ. शशिकांत शिंदे, आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. रोहित पवार, आ. अमोल मिटकरी, आ. ऋतुराज पाटील, रूपाली चाकणकर, माजी आमदार सदाशिव सपकाळ, आ. राम कांडगे, आ. महेश शिंदे, माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. शेखर निकम, आ. सुनील टिंगरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, संजीवराजे नाईक-निंबाळकर, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील व डीवायएसपी सूरज गुरव आदी मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
प्रत्यक्ष
भेटून पाटणचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, युवा नेते रविराज देसाई, प्रभाकर
देशमुख,कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश
मोहिते, युवा नेते जशराज पाटील, देवराज पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील,
डॉ. सुरेश भोसले, जिल्हा परिषदेचे सभापती मानसिंगराव जगदाळे, पश्चिम
महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ, पुणेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, चिपळूण
नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी
अधिकारी स्वप्ना यादव, सनबीम परिवाराचे अनिल गावंडे, प्रशांत लाड व कर्मचारी, किरण साबळे-पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी व कार्यकर्त्यांनी खा. श्रीनिवास पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
