अहमदनगर जिल्हयात वाढले 148 एवढे बाधित रुग्ण...

जिल्ह्यात आज 148 नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर



। अहमदनगर ।  दि.21  फेब्रुवारी ।   जिल्ह्यात आज 139 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर 148 बाधित रुग्णांची रुग्णसंखेत भर पडली आहे. 

 

 

यामध्ये नगर महानगरपालिका हद्दीत 49 रुग्णांची भर पडल्याने शहराची चिंता वाढली आहे. जिल्हयात आता उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 857 वर पोहचली आहे.



जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 19, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 98 आणि अँटीजेन चाचणीत 31 रुग्ण बाधीत आढळले.

 


148 रुग्णांमध्ये मनपा हद्दीमध्ये 49, अकोले 03, जामखेड 01, कर्जत 01, कोपरगांव 14, नगर ग्रामिण 14, नेवासा 03, पारनेर 03, पाथर्डी 0, राहता 07, राहुरी 21, संगमनेर 16, शेवगांव 04, श्रीगोंदा 05, श्रीरामपुर 05, कॉन्टेनमेंट बोर्ड 0, जिल्हयाच्या बाहेरील 02 आदींचा समावेश आहे.



आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाचीं संख्या 139 आहे, यामध्ये मनपा हद्दीमधील 47, अकोले 04, जामखेड 01, कर्जत 08, कोपरगांव 06, नगर ग्रामिण 12 नेवासा 05, पारनेर 08, पाथर्डी 09, राहता 08, राहुरी 05, संगमनेर 20, शेवगांव 02, श्रीगोंदा 01, श्रीरामपुर 03, कॉन्टेनमेंट बोर्ड 0, इतर 02 आदींचा समावेश आहे. 


 घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

माझे कुटुंब माझी जबाबदारी 

Post a Comment

Previous Post Next Post