इंधन दरवाढीला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार : दिलीप सातपुते

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन


बैलगाडीत रस्त्यावर येऊन केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल


। अहमदनगर । दि.05 फेब्रुवारी । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बैलगाडीवर येऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करुन मोदी प्रणित केंद्रातील भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

 

या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, श्याम नळकांडे, संदेश कार्ले, मदन आढाव, अमोल येवले, गिरीश जाधव, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, गणेश बोरूडे,  गणेश कवडे, दत्ता जाधव, शरद झोडगे,  संजय आव्हाड, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

दिलीप सातपुते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे अवाजवी पद्धतीने दरवाढ केली आहे. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना इंधन दरवाढीने आनखी महागाईचा भडका उडाला आहे. कोरोनाच्या संकटातून सावरताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात विष कालवण्याचे पाप केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. 

 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये इंधन दरवाढीचा भाव पन्नास टक्के होऊन खाली कोसळला असताना देखील भारतात पेट्रोल, डिझेलचे भावन गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढीला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर प्रमुख पदाधिकार्‍यांनी देखील आपल्या भाषणात केंद्रातील भाजप सरकारवर निशाना साधून, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला.

Post a Comment

Previous Post Next Post