पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

। मुंबई । दि.18 जानेवारी । भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी भारतीय शास्त्रीय संगीत सर्वार्थाने समृद्ध केलं. शास्त्रीय संगीतातील कलावंतांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या. त्यांना प्रेरणा दिली.

१९९१ मध्ये पद्मश्री, २००६ मध्ये पद्मभूषण तर २०१८ मध्ये पद्मविभूषणने त्यांना सन्मानित करण्यात आले. उस्ताद गुलाम मुस्तफा खान हे कलाक्षेत्रातील राजमान्यता आणि लोकमान्यता लाभलेले ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post