उड्डाणपुलाच्या कामाची खा. विखेंकडून पाहणी

जलवाहिनी स्थलांतर करण्याचे काम 

तातडीने करण्याचे अधिकार्‍यांना निर्देश

। अहमदनगर । दि.18 जानेवारी । नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामासाठी भूसंपादनाचा प्रश्‍न जवळ पास मार्गी लागला. शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा  उड्डाणपुलाची सक्कर चौक ते स्टेट बँक चौका पर्यंत खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सोमवारी (दि.18) सकाळी पाहाणी करुन संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या.

उड्डाणपुलाचे काम सुरळीत व्हावे त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे तसेच पथदिवे व इतर विद्युतीकरणाच्या स्थलांतराची तसेच भूसंपादन झालेल्या जागेचे लवकरात लवकर अतिक्रमण काढून जलवाहिनी स्थलांतराचे काम पूर्ण करण्याचे सूचना केल्या.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील.समवेत महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक योगीराज गाडे ,मा.नगरसेवक निखिल वारे, प्रशांत दारकुंडे, महानगरपालिका उपायुक्त डॉ प्रदीप पठारे,पाणी पुरवठा अभियंता सातपुते, महानगरपालिकेचे मेहत्रे, शहर अभियंता ईथापे, पाणी पुरवठा विभाग रोहकले व राहुल गीते,महावितरण चे सह्ययक अभियंता उल्ले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे गायकवाड,

अतिक्रमण विभागाचे रिजवान शेख,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दिगविजय पाटणकर, श्रीकांत लोखंडे,मुनिर सय्यद,वाहतूक पोलिस निरीक्षक देवरे, उड्डाणपूलाचे ठेकेदार शेळके, वीज वितरणचे ठेकेदार  खेडकर, नगर रचना कार्यालयाचे अधिकारी वैभव जोशी व शहरातील नागरिक उपस्थित होते.

नगर शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भातील 99 टक्के जागा  हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केले गेली असून लवकरच या उड्डाणपुलाच्या कामात येणारे अतिक्रण, पथदिवे, विद्युतीकरणाचे खांब तसेच जलवाहीणीच्या स्थलांतर काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले, नगर शहराच्या विकासाकामांमध्ये राजकरण न करता सर्व पक्षीय सहकार्यने शहराचे विविध विकासकामे पूर्ण करुन असेही त्यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post