। अहमदनगर । दि.12 जानेवारी । प्रेमदान चैकातील एका चायनीज टपरीजवळ प्रवीण रमेश कांबळे (वय 23, रा.बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड) हा विना परवाना तलवार बाळगताना तोफखाना पोलिसांना आढळून आला.
पोलिसांनी त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे कारवाई केली आहे. पोलिस निरिक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
