। अहमदनगर । दि.12 जानेवारी । खोदकाम करण्याचे 4 लाख रूपये किंमतीचे मशिन व त्यांचे कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्यादी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना गुरूवार ते शुक्रवारी दरम्यान घडली आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सादीक शहाबुद्दीने शेख रा. नांदगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नालेगाव शिवारात 4 लाख रूपये किंमतीचे महेंद्र कंपनीचे एमएच 16 बीवाय 7745 व त्यांचे कामदपत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलिसठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सोळंखे करत आहे.
