हिवरे बाजार गावाचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी : संभाजी कदम

शिवसेनेच्यावतीने पोपटराव पवार यांचा सत्कार

। अहमदनगर । दि. 23 जानेवारी । आज कोणतीही निवडणुक म्हटली की चुरस ही आली, त्यातून होणारे हेवे - दावे, आरोप - प्रत्यारोप यातून मूळ विकासाचा मुद्दाच गायब होतांना दिसत आहे. परंतु पोपटराव पवार यांनी अनेक वर्षांपासून या सर्व गोष्टींना दूर ठेवून गावाचा विकास केला. 

गावातील प्रत्येक बारीक - सारीक गोष्टींचा अभ्यास करुन त्यादृष्टीने नियोजन करुन एक आदर्श गांव निर्माण केले. या गावाचा बोलबाला जगभर झाला. अनेक मान्यवरांनी गावास भेट देऊन येथील आदर्श घेऊन गेले. अशा गावातील निवडणुकही आदर्शवतच झाली. हाच आदर्श इतर गावांनी घेऊन गावाच्या विकासात योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

शिवसेनेच्यावतीने पद्मश्री पोपटराव पवार यांची हिवरे बाजार ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे,  दत्ता कावरे, शिवाजी कदम, विष्णू थोरात, प्रविण बेद्रे, संतोष तनपुरे, गणेश पादीर, दिपक पवार, दयानंद वाबळे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी पोपटराव पवार म्हणाले, गावातील प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे असते, परंतु निसर्ग आणि भौतिक अडचणीमुळे गावाच्या विकासाला खिळ बसत असते. परंतु या गोष्टीचा अभ्यास करुन त्यादृष्टीने पावले टाकून हिवरे बाजाराला सर्व गावकरांच्या साथीने आदर्शवत बनविले आहे. 

ही किमया एका दिवसात झाली नाही, तर सातत्य महत्वाचे होते. निवडणुक हा तात्पुरता भाग आहे. ती लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे. त्यादृष्टींचे ही निवडणुक झाली. विजय झालेले आणि सर्वच हे गावाच्या विकासात योगदान देणारे आहेत. या सत्कारामुळे आमच्या कार्यास बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास सुरज देवतरसे, सागर पिंपळे, दिलीप हजारे, दिपक थोरात आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post