थोरात यांची काँग्रेसच्या मंत्र्यांकडून पाठराखण

। मुंबई । दि. 23 जानेवारी ।  महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी मोठी खलबते सुरु असतानाच आता काही नेत्यांनी पुन्हा बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्राचे नेतृत्व देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले, तर पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिावय राहणार नाही, असे मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपले हे मत अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिवांसमोर व्यक्त केले आहे.

ठाकूर यांनी काँग्रेसचे सह प्रभारी आशिष दुवा आणि बी.एम.संदीप यांच्या समोर हे वक्तव्य केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विधानसभा निवडणुकीत 12-13 जागा येतील असे म्हटले जात होते.
कुणी अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते,

तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी धुरा सांभाळून यश खेचून आणले. आपल्या 44 जागा आल्या. थोरात आपण प्रदेशाध्यक्ष राहिलेच पाहिजेत,पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असे त्या म्हणाल्या.

नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्ष सध्या सव्वालाखे यांनी देखील महिलांनी एकत्र येऊन थोरात यांची ताकद वाढवायला पाहिले असे म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post