विद्यानगर रोडवरील घटना : वाहनातील बॅटर्‍यांची चोरी

। अहमदनगर । दि.16 जानेवारी ।  विटभट्टीवर उभ्या असलेल्या तीन वाहनातील बॅटर्‍या अज्ञात चोरांनी चोरुन नेल्या आहे. ही घटना नगर - दौंड रोडवरील विद्यानगर येथील हॉटेल समाधान जवळील विटभट्टी येथे शुक्रवारी (दि.15) पहाटेच्या सुमारास घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, संतोष धर्मा आव्हाड (वय 40,रा.कायनेटीक चौक, आव्हाड विटभट्टी) यांची विद्यानगर येथे हॉटेल समाधान जवळ विटभट्टी आहे.

रात्रीच्या सुमारास आव्हाड यांचे टेम्पो (क्र.एम.एच.12 - के.पी.5917) तसेच एललएमटी केओ एम ए टी एस क्यु कंपनीचे पोकलॅड व ट्रॅक्टर (क्र.एमएच 16 एफ 5017) अशी वाहने उभी होती.

पहाटेच्या सुमारास कोणतरी अज्ञात चोरांनी वाहनातील आठ हजार रुपये किंमतीच्या चार बॅटर्‍या चोरुन नेल्या आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात संतोष आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक योगेश चव्हाण हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post