। अहमदनगर । दि.19 जानेवारी । कंटनेरने कारला दिलेल्या धडकेत कारमधील माय-लेक जखमी झाले आहेत. पारनेर भूमिअभिलेख कार्यालयातील अनिता विजय भिंगारदिवे (रा.भिंगार) व त्यांचा मुलगा अशी जखमींचे नांवे आहेत.
नगर-पुणे रोडवरील चास (ता.नगर) शिवरात पेट्रोलपंपा समोर हा अपघात झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमखी अनिता भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचा मुलगा कारमधून जात असताना चास शिवरात भारत पेट्रोपंपावरुन कंटेनर चालकाने त्यांच्या ताब्यातील कंटनेर अचानक रोडवर घातल्याने कार व कंटेनरचा अपघात झाला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक मरकड करत आहे.
Tags:
Breaking
