कायनेटीक चौकातील हॉटेलमध्ये चोरी

। अहमदनगर । दि.25 जानेवारी ।  हॉटेलच्या गेट जवळील पार्कीगचे गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरानी आत प्रवेश केला. हॉटेलच्या काऊंटर मधील चार हजार रुपये व एक मोबाईल असा ऐवज चोरुन नेला. ही घटना नगर-पुणे रोडवरील कायनेटीक चौकातील हॉटेल स्वराज पॅलेस येथे रविवारी (दि.24) पहाटेच्या सुमारास घडली.


या बाबतची माहिती अशी की नगर-पुणे रोडवरील कायनेटीक चौकातील हॉटेल स्वराज पॅलेस येथील वॉचमन अरुण विठ्ठल आडेप (वय 61, रा.नेहरु मार्केट, भराड गल्ली, तोफखाना) हे ड्यूटीवर असताना दोन अज्ञात चोरांनी हॉटेल मधील काऊंटर वकपाटाची उचकापाचक केली.


हॉटेलच्या काऊंन्टर मधील 3 हजार रुपय व 1 हजार रुपयांचा मोाबाईल असा सुमारे 4 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अरुण आडेप यांच्या फिर्यादीवरुन भादंविक 457, 380,34 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस नाईक पालवे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post