शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मागण्यासाठी मंत्री तनपुरेंना निवेदन

। अहमदनगर । दि.25 जानेवारी । शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सेवानिवृत्ती कर्मचारी शिष्टमंडळाने नामदार प्राजक्त तनपुरेंना निवेदन दिले.

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाच्या लाभासह, सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावांना मंजुरी देवून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना निवृत्तीवेतन सुरू करावे.

तसेच 7 डिसेंबर 2018 व 16 फेब्रुवारी 2019 हे शासन निर्णय रद्द करुन सध्या सेवेत असलेल्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करुन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करुन वेतननात लाभ मिळावा

अशा विविध प्रलंबित प्रश्नांबाबत नामदार प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांना नगर येथे सेवानिवृत्ती कर्मचारी शिष्टमंडळाने निवेदन दिले.

यावेळी निवृत्ती कानवडे, एकनाथ देवढे, बाळासाहेब ठोंबरे यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव संतोष कानडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post