। अहमदनगर । दि. 22 जानेवारी । राज्यभर गाजलेल्या भेसळ डिझेल प्रकरणासह अवैध धंदे चालकांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे नगरचे तत्कालिन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांची अमरावती येथे पोलीस अधीक्षकपदी (नागरी हक्क सरंक्षण) नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे आदेश दि. 21 जानेवारी रोजी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहे.
डॉ. राठोड यांचे आठ दिवसांत नियुक्तीचे आदेश काढा, असे निर्देश न्यायालयाने गृहविभागाला दिले होते. त्यानंतर गृह विभागाने डॉ.राठोड यांची अमरावती येथे पोलीस अधीक्षकपदी (नागरी हक्क सरंक्षण) नियुक्ती केली. डॉ. राठोड यांनी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नगर रेथे 5 ऑक्टोबर 2020 रोजी पदभार घेतला.
अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीमध्रे डॉ.राठोड यांनी संगमनेर, श्रीरामपूरसह अनेक ठिकाणी बेकारदेशीर धंद्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये सुमारे 65 लाखांचा मुद्देमाल जप्त केले. कारवाईमध्ये 21 गुन्हे दाखल करून 27 जणांना अटक केली होती.
बनावट भेसळ डिझेल घोटाळा देखिल उघडकीस आणला. डिझेल घोटाळा उघडकीस आल्यानंतर काही काळातच डॉ. राठोड रांची तडकाफडकी बदली करण्यात आली. काही कालावधीत अन्यायकारक बदली झाल्याने न्याय मिळण्यासाठी डॉ. राठोड यांनी मुंबई मॅट न्यायालयात धाव घेतली.
बदली विरोधात दावा दाखल केला. मॅट न्यायालयाने राठोड यांना योग्य त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी, तसे नियुक्तीचे आदेश गृहविभागाने काढावे असे निर्देश दिले. त्यानंतर गृह विभागाने डॉ. राठोड यांची बदली अमरावती येथे पोलीस अधीक्षकपदी (नागरी हक्क सरंक्षण) नियुक्ती केली आहे.
डॉ. राठोड यांनी सक्षमपणे कर्तव्य बजाविणार असून लवकरच रुजू होणार सांगितले. तसेच नगरला असताना झालेले बदली आदेश रद्द व्हावे यासाठी न्यायालयात प्रकरण असल्याचे त्यांनी सांगितले. नगरला पुन्हा संधी मिळाल्यास सक्षमपणे सेवा करणार असल्याचे ते म्हणाले.
