बिबट्याने हल्ला करुन 3 शेळ्या केल्या फस्त

। अहमदनगर । दि.13 जानेवारी ।  संगमनेर तालुक्यातील पिप्रींलौकी अजमपूर येथे लक्ष्मण गिते यांच्या वस्तीवर बिबट्याने सोमवारी रात्री सात शेळ्यांवर हल्ला करुन त्यातील तिन शेळया फस्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सकाळी बिबट्याच्या हल्लयामध्ये अन्य 3 शेळ्या जखमी झाल्या आहे. एका शेळीला घेऊन बिबट्याने पलायन केले. बिबट्याने पाण्याच्या टाकीचा आधार घेत गोठ्यात प्रवेश करत शेळ्यांवर हल्ला केला.

मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनपाल उपासनी, एस. बी. सोनवणे, चौधरी, डॉ. शिदे आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बिबट्याच्या दहशतीने नागरिक धास्तावले असून पिंजरा लावावा, अशी मागणी गिते परिवाराने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post