नगर, (दि.29 डिसेंबर) : बस स्टॅन्ड परीसरात प्रवाशांचे सोने चोरी करणार्या श्रीरामपुरमधील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला राजुर पोलीस स्टेशनच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
दि.26 डिसेंबर रोजी फिर्यादी कुसुम लक्ष्मण नाडेकर (वय 49 वर्षे,धंदा-घरकाम रा.पिचड शाळे जवळ, राजुर ता.अकोले जि.अहमदनगर) या बसमध्ये बसताना अज्ञात इसमांने त्यांच्या पर्स मधुन 96,000/- रु.किमतीचे सोन्याचा नेकलेस चोरुन घेवुन पोबारा केला. यानंतर त्यांनी राजुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सपोनि पाटील, पोसई खैरनार करीत असताना श्रीरामपुरची सराईत टोळी यांनी गुन्हा केला आहे अशी गोपणीय माहिती मिळाल्याने पथकातील पोसई खैरनार, पोहेकॉ आघाव, फटांगरे, गाढे, वाडेकर अकोले पोस्टेचे पोकॉ मैड यांनी अकोले स्टैंड येथे जावुन सापळा लावून आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली.
यामध्ये साहिल नाशिर खान (वय 21 वर्षे,रा.वार्ड नं.3 सार्वजनिक संडासाजवळ श्रीरामपुर) ,अर्जन कानिफनाथ भोसले (वय 21 वर्षे,रा.वार्ड नं.2 अहिल्यादेवी नगर श्रीरामपुर), कमलेश उत्तम पवार (वय 21 वर्षे रा. वार्ड नं.2 अहिल्यादेवी नगर श्रीरामपुर), गुफरान निसार पठाण (वय 21वर्षे,रा.वार्ड नं.2 सोमेश्वर पथ श्रीरामपुर) यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.
त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी यापुर्वीही राजुर परीसरात गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांना मुद्देमालासह राजुर पोलीस यांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधिक्षक श्रीरामपुर श्रीमती दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी सपोनि नितीन पाटील व अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.