आघाडी सरकारच्या नव्या कायद्यामुळे महिलांना ‘शक्ती’ : रेश्माताई आठरे


नगर, (दि.12 डिसेंबर) : महिलांवर होणारे त्याचार रोखण्यासाठी तसेच गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा केला असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आघाडी सरकारने राज्यात शक्ती कायदा करण्याचे ठरविले आहे. शक्ती कायद्याचे विधेयकास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत आहोत असे सौ. आठरे यांनी म्हटले आहे.

 

या कायद्यामुळे महिलांना शक्ती मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्माताई आठरे यांनी केले. नव्या कायद्यानुसार महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा खटला 21 दिवसांत निकाली काढण्यात येणार आहे. 

 

याच बरोबर बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा, अल्पवयीन मुलींवर अत्याचारास मरेपर्यंत जन्मठेप आदी स्वरूपाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. नव्या शक्ती कायद्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसणार असून महिलांनी अत्याचाराच्या विरोधात निर्भीडपणे पुढे यावे, असे सौ. आठरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post