’सेल्फी विथ तिरंगा’ मोहीम उत्साहात संपन्न
नगर, (दि.29 डिसेंबर) : नगर मनपात भाजप, राष्ट्रवादीमध्ये अभद्र युती आहे. यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून देखील शहराचा विकास खुंटला आहे, अशी थेट टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.* काँग्रेस पक्षाच्या 136 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सेल्फी विथ तिरंगा मोहिमे प्रसंगी पक्ष कार्यालयात काळे बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते, माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, निजामभाई जहागीरदार, डॉ.रिजवान अहमद, मागासवर्गीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, एनएसयूआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, युवक काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष ड.अक्षय कुलट, नामदेवराव चांदणे, मुबीनभाई शेख, डॉ. दिलीप बागल, अनंतराव गारदे, अनिसभाई चुडीवाल, नलिनीताई गायकवाड, जरीना पठाण, सुनिता बागडे, नीता बर्वे, कौसर खान, उषाताई भगत आदी उपस्थित होते.
यावेळी काळे म्हणाले की, शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट झाले आहे. घंटागाडी शहराच्या सर्व भागांमध्ये पोहोचू शकत नसल्यामुळे अनेक महिलांचे हाल होत आहेत. पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील ओढे-नाले रातोरात गायब होत आहेत.
भाजप, राष्ट्रवादीच्या मिली-भगतमुळे फक्त खिसे भरण्याचा कार्यक्रम जोरात सुरू असून सामान्य नगरकर मात्र समस्यांनी त्रासून गेला आहे. भाजपा सारख्या जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी नगर शहरात मात्र स्थानिक राष्ट्रवादी मोदी-फडणवीसांच्या भाजप समवेत असल्यामुळेच शहराचा विकास खुंटला असल्याची घणाघाती टीका शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
यावेळी दीप चव्हाण यांनी सद्य राजकीय स्थितीवर नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या प्रश्नावरती महानगरपालिकेत आक्रमक भूमिका घेण्याचे सूतोवाच केले. ज्ञानदेव वाफारे यांनी काँग्रेस स्थापनेचा इतिहास सांगत पक्षाने राष्ट्र उभारणी मध्ये केलेल्या कामांची माहिती यावेळी मांडली. नलिनीताई गायकवाड यांनी अनेक महिला काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याने महिलांचा वाढता ओघ उत्साह वाढविणारा असल्याचे यावेळी म्हटले आहे.
यावेळी प्रशांत वाघ, क्रीडा काँग्रेसचे प्रवीणभैय्या गीते, अमितभाऊ भांड, सुजित जगताप, योगेश जयस्वाल, साहिल शेख, सोमनाथ गुलदगड, शबाना सय्यद, शाहीन बागवान, अनिल गायकवाड, अजय मिसाळ, सिद्धेश्वर झेंडे, शंकर आव्हाड, शरीफ सय्यद, अक्षय पाचारणे, संजय भिंगारदिवे,भाऊसाहेब डांगे आदी उपस्थित होते. निजामभाई जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले. आभार ड.अक्षय कुलट यांनी मानले.