वाहनाच्या धडकेत पदचार्‍याचा मृत्यू


नगर, (दि.13 डिसेंबर) : चारचाकी वाहनाने पायी जाणार्‍या एकाला धडक दिल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. राजेंद्र बन्सी बुर्‍हाडे  (रा.मलठण, ता.कर्जत) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नांव आहे.


नगर-मनमाड रोडवरील माऊली संकुल जवळ हा अपघात झाला. याप्रकरणी वाहन (क्र.एमएच 16 के-6684) चालकाविरुध्द तोफखान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिलीप दत्तु बुर्‍हाडे (रा.मलठण,ता.कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. राजेंद्र बुर्‍हाडे हे नगर - मनमाड रोडने माऊली संकुल समोरुन पायी चालले असताना चारचाकी वाहन चालकाने त्यांना धडक दिली.


या धडकेत राजेंद्र यांना मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार केदार हे करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post