नगर, (दि.14 डिसेंबर) : तुमच्या मुलाला मुलगी दाखवतो, असे सांगत त्यांच्याकडून वेळोवेळी सुमारे 1 लाख 40 हजार रुपये घेऊन मुलाचे आळंदीत लग्न लावून दिले असे म्हणत फसवणूक केली.
परंतु ज्या मुलीसोबत लग्न लावले ती नववधु मात्र वराकडील मंडळीच्या हातावर तुरी देऊन पसार झाली आहे. ही घटना नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळी घडली आहे.
याबाबत एका उपनगरातील त्या तरुणाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नववधुसह लग्न जमवणारे अशा एकूण सहा जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भिांगर परिसरात राहणार्या तरुणाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
