पुणे (दि.28 नोव्हेंबर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते आमदार भारत भालके यांचे उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले ते ६० वर्षांचे होते. भारत भालके यांनी पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण आले होती. या विषाणूवर मात करत ते बरेही झाले होते.
पण कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसात झालेला संसर्ग वाढला त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावातील शेतात आमदार भारत भालके यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पुण्याहून सकाळी सात वाजता पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावाकडे पुण्याहून निघेल. यानंतर चार वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल. दुपारी चार वाजता याच ठिकाणी त्यांच्या शेतात भालके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
