स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; अट्टल चोर जेरबंद


नगर, (दि.27 नोव्हेंबर)  : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरीतील आरोपीस वाळुंज (जि. औरंगाबाद) येथे जेरबंद केले. 

 

अविनाश दानियल चौतमल असे आरोपीचे नाव आहे. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोहेकॉ बबन मखरे, पोना रविकिरण सोनट क्के, संतोष लोंढे, पोकॉ राहुल सोळुंके, पोकॉ जालिंदर माने, संभाजी कोतकर आदींनी ही कारवाई केली. 

 

पेट्रोल पंपावर ट्रक उभा करून ट्रकचालक झोपला असताना अज्ञात इसमाने ट्रकच्या काचा फोडून ट्रक चालकास शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

या गुन्ह्याचा तपास करताना चोरीस गेलेला ऐवज अविनाश चौतमल याच्याकडे असल्याची गोपनिय माहिती पोनि कटके यांना मिळाली. कटके यांच्या सूचनेवरून पोलिस पथकाने वाळुंज येथे सापळा रचून आरोपी चौतमल यास ताब्यात घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post