जिल्हा मराठाचा दसरा महोत्सव साधेपणाने साजरा
नगर, (दि.26 ऑक्टोबर) : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जिल्हाभरातील महाविद्यालये, विद्यालयांच्या निकालाची परंपरा पाहुन विद्यार्थी प्राधान्यक्रमाने प्रवेशासाठी गर्दी करत असतात. संस्था घडवण्यास संस्था पदाधिकार्यांबरोबरच प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदानही महत्वाचे आहे. सेवक वर्ग हा संस्थेचा पाया आहे. असे मत जिल्हा मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांनी जिल्हा मराठाच्या दसरा महोत्सव साधे पध्दतीने साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, विश्वस्त जयंत वाघ, सदस्य राहुल झावरे, प्राचार्य डॉ. बी. एच झावरे, अशोक दोडके, डॉ. सुरेश बाबर, एम.एम. तांबे, योगिता सद्रे, महेश नगरकर, संस्था निरीक्षक सदाशिव मोढवे, रंगनाथ भापकर, व्यवस्थापक बबनराव साबळे, रामदास सातपुते, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा महोत्सवास महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, संस्था निरीक्षक व शिक्षकेतर सेवक यांच्या निवडक उपस्थातीत कोरोना नियमांचे पालन करत साधे पध्दतीने साजरा करण्यात आला.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले, जिल्हा मराठा विद्या प्रासरक समाजाची दसरा महोत्सव साजरा करण्याची शतकी परंपरा कायम आहे. जिल्हा मराठा संस्था रुजवण्यासाठी चौथे शिवाजी महाराज यांनी जे प्रयत्न केले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच संस्था उभारणीत दिवंगत संस्था पदाधिकार्यांच्या स्मृती जागवण्यासाठी जिल्हा मराठा संस्था गेल्या शंभर वर्षापासून दसरा महोत्सव साजरा करते.
सहसचिव अॅड. विस्वासराव आठरे पाटील, माजी खासदार चंद्रभान आठरे पाटील यांच्या स्मरणार्थ कायद्याचा अभ्यास करणार्या विद्यार्थांसाठी सुमारे पाच लाख रूपयांची सन 1937 पासूनचे विविध कायदे विषयक पुस्तके लॉ कॉलेजच्या लायब्ररीसाठी मोफत देत असल्याचे सहसचिव अॅड. विस्वासराव आठरे पाटील घोषीत केले. प्रारंभी रेसिडेंन्शिअलचे प्राचार्य अशोक दोडके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन धनंजय म्हस्के यांनी तर अभार संस्था निरीक्षक रंगनाथ भापकर यांनी मानले.