पंकजा मुंडेच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावी काम : माजी मंत्री दिलीप गांधी

नगर, (दि.27 ऑक्टोबर) : सर्वसामान्यांच्या नेतृत्वाचा स्व.गोपीनाथ मुंढे यांचा वारसा पंकजा मुंडे यांनी चांगल्या पध्दतीने चालविला आहे. पक्षाने राष्ट्रीय महामंत्री हे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रिय मंत्री दिलीप गांधी यांनी व्यक्त केला आहे.


पंकजा मुंडे या नगरमार्गे पुण्याला जात असताना गांधी यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत केले.


मुंडे म्हणाल्या की, दिलीप गांधी कुटुंबियांशी मुंडे कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडले आहेत.


राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत संकटाळात जनतेला करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेले पॅकेज मी स्वागत करते. मात्र, यापेक्षा अधिक मोठे पॅकेज देणे अपेक्षित होते. केंद्र सरकारही मोठी मदत सर्व जनतेला या संकटकाळी करत आहे.


याप्रसंगी आशिष अनेचा, यश शर्मा, डॉ.रवींद्र खेडकर, डॉ.ज्ञानेश्‍वर दराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post