नगर, (दि.18 ऑक्टोबर) : राज्यातील जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या माता मळगंगा देवीची घटस्थापना निघोज येथील मंदीरात पुजाअर्चा करत करण्यात आली.
यावेळी पोपट महाराज देशपांडे यांनी मंत्रोच्चार करत पुजा केली. यावेळी देवीचे पुजारी सुनिल गायखे उपस्थित होते. त्यानंतर घटस्थापनेला सारीका गायखे, सुवर्णा गायखे, संध्या गायखे, देवयानी गायखे, दुर्वा गायखे, दर्शना गायखे आदी महिला भगिणी उपस्थित होत्या.
पहाटे पुजारी सुनिल गायखे यांनी पुजाअर्चा केली व त्यानंतर घटस्थापनेची तयारी पुर्ण केली. पहाटे साडेपाच वाजता देवीचे गोंधळी दुणगुले बंधू यांनी संबळ वाजवत महाआरती केली. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवानिमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
