ते पुढे म्हणाले की, शेतकर्यांनी मदत मागितली होती. मात्र सरकारने शेतकर्यांना भिकारी असल्याच्या भावनेतून मदत केल्याचे जाणवते. 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र त्यातील अर्धे पैसे रस्ते, विजेचे खांब, Irrigation क्षेत्रातील दुरुस्तीवर खर्च करणार आहे. शेतकर्यांना या पॅकेज मधून फार काही मिळणार नाही. मात्र आकडा मोठा दिसत असल्यामुळे टॅक्स भरणार्या लोकांची दिशाभूल होऊन शेतकर्यांचे चुकीचे चित्र तयार होईल.
ही शेतकर्यांची घोर निराशा करणारी बाब आहे. किमान 50,000 हजार रुपये हेक्टरी मदत करणे अपेक्षित होते. मात्र या सरकारने देखील शेतकर्यांना लाचार व गरीब ठेवण्याचे धोरण कायम ठेवले आहे. आता शेतकर्यांनी यांच्या राजकारणाचा मतदानाच्या दिवशी पंचनामा करण्याची वेळ आली आहे. सरकारने नुकसानभरपाईची रक्कम वाढवून न दिल्यास शेतकर्यांनी सरकारवर बहिष्कार टाकावा असे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले असून शेतकर्यांसोबत रस्त्यावर लढाईस तयार असल्याचे म्हंटले आहे.
