सैनिक कल्याण विभागाच्या वतीने सैनिक पत्नीस अनुदानाचे वितरण
दहा दिवसात अनुदान मिळवून दिल्याबद्दल नवनिर्वाचित
जिल्हा सैनिक अधिकारी वाकचौरे यांचा सन्मान
नगर, (दि.18 ऑक्टोबर) : आठ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पाठपुराव्याने, अवघ्या दहा दिवसात सैनिक पत्नीला सैनिक कल्याण विभागातून जिल्हा सैनिक अधिकारी विजय वाकचौरे यांनी 50 हजार रुपयाचे अनुदान मिळवून दिले. या धनादेशाचे वितरण सैनिक पत्नी मंगल दिपक थोरात यांना करण्यात आले. तर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वाकचौरे यांचा फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृत्ती भाबड, नवनाथ वारे, शिवाजी गर्जे, दादासाहेब पठारे आदि उपस्थित होते.दिवंगत सैनिक दिपक थोरात यांच्या सैनिक पत्नी मंगल दिपक थोरात यांनी नोहेंबर 2019 ला शिरूर येथे फ्लॅट खरेदी केला होता. सैनिक कल्याण विभागातून त्यांना 50 हजार रूपये अनुदान मिळणार होते. त्यासाठी मंगल थोरात यांनी जिल्हा सैनिक कल्याण अहमदनगरला सर्व कागदपत्रे डिसेंबर 2019 जमा केली. अहमदनगर जिल्हा सैनिक कल्याण विभागणे चौकशी अहवालसाठी पुणे जिल्हा सैनिक कल्याण विभागाला पाठवले असता सैनिक कल्याण विभागणे चौकशी अहवालसाठी तब्बल आठ महीने लागले.
या संदर्भात सैनिकाच्या पत्नीस सदर अनुदान मिळण्यासाठी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने अहमदनगर जिल्हा सैनिक कल्याण विभागास निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला. या संदर्भात तातडीने दखल घेत अवघ्या दहा दिवसात नवनिर्वाचित सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे यांनी 50 हजारच्या अनुदानाचा धनादेश सैनिक पत्नीस दिला मिळवून दिला आहे.
फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे म्हणाले की, माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहमदनगर जिल्हा सैनिक कल्याण विभागास कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाला आहे. सैनिकांप्रती व शहीद परिवाराबद्दल त्यांच्या मनात मोठी आस्था व काम करण्याची तयारी आहे. सैनिकांच्या समस्यांची त्यांना जाणीव असल्याने जिल्ह्यातील माजी सैनिक व शहीर परिवारांचे प्रश्न ते सोडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना वाकचौरे म्हणाले की, सैनिकांमुळे देश सुरक्षीत आहे. सैनिकांचा प्रवास खुप खडतर असतो याची जाणीव मला नक्कीच आहे. माजी सैनिक, विधवा सैनिक पत्नी, शहीद परिवाराची कुठलीही समस्या तात्काळ सोडवण्यास कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags:
Ahmednagar
