लॉटरीच्या आमिषाने महिलेची 17 लाख 37 हजाराची फसवणूक

 

सातारा, (दि.25 ऑक्टोबर) : मोबाइल नंबरला 25 लाखाची लॉटरी व एक बीएमडब्ल्यू कार लागल्याचे आमिष दाखवून महिलेची 17 लाख 37 हजाराची फसवणूक अज्ञात भामट्यांनी केली. 


या प्रकरणी राजेंद्र नारायण सांभारे (रा. समता पार्क, शाहूपुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मोबाइल धारकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

फिर्यादी सांभारे यांच्या पत्नीच्या मोबाइलवर दि. 18 सप्टेंबर रोजी अज्ञात मोबाइलधारकाने कॉल करून तुमच्या मोबाइल नंबरला 25 लाखाची लॉटरी व 1 बीएमडब्ल्यू कार लागल्याचे आमिष दाखवले. 

 

त्यांचा विश्‍वास बसावा यासाठी त्यांना एकाने फोन करून स्टेट बँकेतून व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून त्यांना लॉटरीबाबत माहिती दिली. यानंतर बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यावर 17 लाख 37 हजार रुपये भरण्यास भाग पाडले.


दि. 19 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी संशयितांच्या आमिषाला भुलून पैसे भरले. मात्र, यानंतरही त्यांना कोणत्याच  प्रकारची लॉटरीची रक्कम मिळाली नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करत आहेत.  

Post a Comment

Previous Post Next Post