अहमदनगर जिल्ह्यात आज २४१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

आतापर्यंत ५२ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२७ टक्के

आज १६८ रुग्णांना डिस्चार्ज तर २४१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

 

नगर, (दि.25 ऑक्टोबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ३६६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२७ टक्के इतके झाले आहे. 

 

दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७५८ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५६ आणि अँटीजेन चाचणीत ८४ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३,अकोले ०७,  कर्जत ०१, नगर ग्रामीण १८, नेवासा ०३, पारनेर १०, पाथर्डी ०४, राहुरी ०१,  संगमनेर ०२, शेवगाव ०३, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०४ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०२, पारनेर ०४, पाथर्डी ०४, राहाता ०६, राहुरी ०२, संगमनेर ०८, श्रीगोंदा ०१,  श्रीरामपूर ०४, कॅंटोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ८४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा १०, अकोले ०१, जामखेड ११, कर्जत ११, कोपरगाव ०५,  नगर ग्रामीण ०७, पाथर्डी १४, राहाता ०१, शेवगाव १७, श्रीगोंदा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, जामखेड ०८, कर्जत १५, कोपरगाव ०१, नगर ग्रा १७, नेवासा ०६, पारनेर १०, पाथर्डी २६, राहुरी ०२, संगमनेर ०१, शेवगाव ३२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:५२३६६

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १७५८

*मृत्यू:८४१

*एकूण रूग्ण संख्या:५४९६५

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक: २५ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता

Post a Comment

Previous Post Next Post