'माझे कुटुंब माझी जबाबदारी' आरोग्य अभियानाचा हिंगणगाव येथे शुभारंभ

नगर, (दि.22 सप्टेंबर) : माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाचा शुभारंभ हिंगणगाव येथे प्रविण कोकाटे सभापती पंचायत समिती अहमदनगर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या कामाची व कर्मचाऱ्यांची  प्रशंसा केली.
 

या अभियानांतर्गत गावपातळीवर आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाचे तापमान व ऑक्सिजन प्रमाण याची तपासणी करणार आहे. सदरील  सर्वेक्षणा  दरम्यान संशयित आढळलेल्या नागरिकांना लक्षणानुसार पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे, आपल्या जवळच्या व्यक्ती, कुटुंबातील सर्व व्यक्ती, मित्रपरिवार, सहकारी, कार्यालयीन कर्मचारी यांच्या आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी आपली प्रत्येकाने घ्यावी असे आहे  हिंगणगावचे  सरपंच  आबासाहेब  सोनवणे यांनी सांगितले.
 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते  हलिमा पठाण, दादाभाऊ सोनवणे, साहिल पठाण, ग्रामपंचायत सदस्या निलम दुबे यांचे तापमान व ऑक्सिजन प्रमाण यांची तपासणी करण्यात आली. 

प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, नेहमी वापरातील वस्तू निर्जंतुकीकरण केल्या पाहिजेत, प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे असे आवाहन पंचायत समिती सदस्य डॉ.दिलीप पवार यांनी केले. यावेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी या प्रतिज्ञेची शपथ सर्व ग्रामस्थांना पंचायत समिती सभापती प्रविण कोकाटे यांनी दिली.
 

या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती प्रविण कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, पंचायत समिती सदस्य डॉ.दिलीप पवार, हिंगणगाव सरपंच आबासाहेब सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती मांडगे, डॉक्टर निलेश कोल्हे, डॉक्टर सायली भिंगारदिवे, डॉ. वृषाली झावरे, राजेंद्र कोकाटे, बाळासाहेब ठोंबरे, दिलीप झावरे, आशाबाई ढगे, निलम दुबे, मोहिनी सोनवणे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक, ग्रामसेविका सुजाता खर्से, पांडुरंग सोनवणे, बाळासाहेब कांडेकर, संभाजी कोल्हे, निसार पठाण, भरत कांडेकर, मुकुंद दुबे, आरोग्य सेविका पुष्पाताई मगर, आरोग्य सेवक विक्रम ससे, गणेश महाजन, दादाभाऊ सोनवणे, अर्जुन अडसूळ, अंगणवाडी सेविका, आशा  सेविका  व  ग्रामस्थ  उपस्थित  होते.

Post a Comment

Previous Post Next Post