पैशाची बॅग घेऊन पाळलेला चोरटा अवघ्या दीड तासात जेरबंद!


खैरी निमगाव  (दि.22 सप्टेंबर) : पेट्रोल पंपाचा भरणा करण्यासाठी निघालेल्या व्यक्तीच्या हातातील बॅग हिसकावून पळालेल्या चोरट्यास पाठलाग करून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण व श्रीरामपुर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.


याबाबत अधिक माहिती अशी, चितळी (त. राहाता) येथील बी. जे. साळुंके पेट्रोल पंपाचे 1 लाख 68 हजार रुपये बँकेत भरण्यासाठी निघाले होते. चितळी डिस्टीलरीजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हाताला हिसका देऊन पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. साळुंके यांनी पूणतांब्याच्या दिशेने चोरट्यांचा पाठलाग केला. गावकऱ्यांनी साळुंके यांची मदत केली. दरम्यान, पोलिसांनी उसात पाळलेल्या चोराला जेरबंद केले.


तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मसूद खान, स्थानिक गुन्हे शाखेचे शंकर चौधरी, सपोनि शिंदे, पोलीस नाईक अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.  अवघ्या दीड तासात चोराला जेरबंद केल्याने पोलीस कारवाईचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post