संपदा प्रकरणी शिक्षा झालेले ज्ञानदेव वाफारे पक्षादेशावरून निलंबित

संपदा प्रकरणी शिक्षा झालेले ज्ञानदेव वाफारे पक्षादेशावरून निलंबित

जिल्हा समन्वयक पदी लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती : जयंत वाघ

 

। अहमदनगर । दि.18 एप्रिल 2024 । बहुचर्चित संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानदेव वाफारे यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांना जिल्हा काँग्रेस कमिटीने निलंबित केले आहे.  अनिश्चित काळासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी पत्रक काढून दिली आहेत.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष हा सदैव संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या पाठीशी उभा असून संपदा संस्थेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी पक्षाने वेळोवेळी निषेध केला आहे. याप्रकरणी वाफारे यांना पाठीशी घालण्याचा प्रश्न नसून पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या तसेच हाय कमांडच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. वाफारे यांच्या ऐवजी जिल्हा समन्वयक पदावर नव्या पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचे वाघ यांनी जाहीर केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post