अहमदनगर जिल्ह्यात आज नव्या ५७७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

आतापर्यंत एकूण १५६३६ रुग्ण बरे  : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.५६ टक्के


नगर (दि.27 ऑगस्ट) : अहमदनगर  जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८०.५६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा  वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५०० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९६, अँटीजेन चाचणीत २४४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, संगमनेर ०२, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १३, पारनेर ०३, अकोले ०१, राहुरी ०१, जामखेड ०५ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २४४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ५६, संगमनेर १७,  राहाता २६, पाथर्डी २१, श्रीरामपुर १५, कॅंटोन्मेंट ०९,  नेवासा १३, श्रीगोंदा २१, अकोले १३, राहुरी ०२, शेवगाव ०९, कोपरगाव २६, जामखेड 0६ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २३७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३४, संगमनेर २६, राहाता १३, नगर ग्रामीण २९, श्रीरामपुर ०४,, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा ०५, पारनेर ०४, अकोले ०९,  राहुरी ०६, कोपरगांव ०२, जामखेड ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६२१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २४५, संगमनेर १५, राहाता ३५, पाथर्डी २५, नगर ग्रा.७९, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट १५, नेवासा २९, श्रीगोंदा २६, पारनेर २३, अकोले १५, राहुरी २०, शेवगाव १४, कोपरगाव २२, जामखेड २६, कर्जत ०६ आणि इतर जिल्हा ०१  अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: १५६३६

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३५००

*मृत्यू: २७२

*एकूण रूग्ण संख्या:१९४०८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक: २७ ऑगस्ट, रात्री ७ वा.  

STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

Post a Comment

Previous Post Next Post