संघाचे प्रश्‍न सोडविणारा मार्गदर्शक हरपला : प्रदीप लोंढे

राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्यावतीने
स्व.अनिल राठोड यांना श्रद्धांजली
 

नगर (दि.17 ऑगस्ट ) : शिवसेनेचा बुलंद आवाज असलेले स्व.अनिल भैय्या राठोड यांना सलग 25 वर्षे लोकांनी आमदार म्हणून निवडून दिले. सर्वसामान्यांच्या प्रश्‍न आणि अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. जनतेचा आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. दृष्टीहीनांच्या विविध प्रश्‍नांसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. भैय्यांनी नेहमी दृष्टीहीनांना शालेय साहित्य, मानधनासाठी सहकार्य करत. संघाच्या प्रत्येक कार्यात ते योगदान देत असत. त्यांच्या जाण्याने संघाचा मार्गदर्शक हरपला, अशी भावना राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे राज्य सचिव प्रदीप लोंढे यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्यावतीने माजी मंत्री स्व.अनिल भैय्या राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी राज्य सचिव प्रदीप लोंढे, जिल्हाध्यक्ष नितीन सोनार, जिल्हा महासचिव  श्रीकांत माचवे, गोरख दरंदले, प्रसाद मोरे, अयुब शेख, आरती लाचव, नंदिनी गुलपेल्ली आदि उपस्थित होते.

याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, स्व.अनिल भैय्यांनी सर्वांसाठीच मोठे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य यापुढे असेच सुरु ठेवणार आहोत. दृष्टीहीन संघटनेला यापुढेही असाच सहकार्य यापुढेही सुरु राहील. तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता.

याप्रसंगी उपस्थितांनी स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या अनेक आठवणी सांगतांना गहिरुन आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विशाल वालकर, मनोज चव्हाण आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post