नगर, (दि.02 जुलै) : बेकायदेशीरपणे गावठी कट्टा जवळ बाळगून तो विक्रीचा प्रयत्न करणार्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.1) पाथर्डी ते खरवंडी कासार जाणार्या रोडवर तुळजावाडी फाटा येथे करण्यात आली आहे.
तुळावाडी फाटा येथे काळ्या रंंगाच्या पल्सर दुचाकीवरुन जाणार्या दोघांना एलसीबीच्या पथकाने चौकशी दरम्यान ताब्यात घेतले आहे. यामध्ये रोहिदास उर्फ रोहित अशोक गायकवाड (वय 23, रा.खरवंडी कासार ता.पाथर्डी), दादासाहेब उर्फ लक्ष्मण मल्हारी वाळके (वय 20, रा.कोरडगाव ता.पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
याची एलसीबी पथकाने पंचासमक्ष झडती घेतली असता, 25 हजार रु.किंमतीची गावठी बनावटीचे कट्टा, 400 रु.किंमतीचे जिवंत काडतूसे व 1 लाख रु.चे बजाज पल्सर (एमएच 3, डीएफ 9222) असा एकूण 1 लाख 25 हजार 400 रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोकाँ संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.नि.दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोना ज्ञानेश्वर शिंदे, रविंद्र कर्डीले, रवि सोनटक्के, पोकाँ रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, संदीप चव्हाण, मेघराज कोल्हे, चापोहेकाँ संभाजी कोतकर आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:
Crime